Home क्रीडा चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज रंगणार वन-डे सामना

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज रंगणार वन-डे सामना

0
22

India and West Indies team

 

चेन्नई वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये आजपासून एकदिवसीय मालिकेला दुपारी १.३० वाजल्यापासून सुरूवात होत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ही लढत होणार आहे.

टी-20 प्रमाणेच एकदिवसीय क्रिकेट प्रकारातही यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे बारकाईने लक्ष असेल. फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही बाबतीत त्याच्याकडून निराशा होत आहे. त्यामुळे कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवण्याची संधी त्याला या मालिकेत मिळणार आहे.

भारतीय संघ :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज संघ :- किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, शाय होप, खॅरी पीएरी, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रिएल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिम्रॉन हेटमायर, एव्हिन लेविस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनिअर. शिवम दुबे (डावीकडून), श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.


Protected Content

Play sound