लखनऊ वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय शूटर वर्णिका सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने एक पत्र लिहून निर्भयाच्या दोषींना मला फासावर लटकवायचे आहे, अशी मागणी केली आहे.
निर्भया प्रकरणातील आरोपी सध्या तिहार कारागृहात असून, या चौघांना एकत्र फाशी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चारही आरोपींना महिलेंकडून फासावर लटकवण्यात यावे. यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल, असे वर्तिका सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील, अशी मला आशा आहे, असेही वर्तिका सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.