Home Uncategorized छी…थूं…विकृताकडून सख्या आईवरच बलात्कार

छी…थूं…विकृताकडून सख्या आईवरच बलात्कार

2rapecase 56 1

2rapecase 56
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) दारूच्या आहारी गेलेल्या एका २० वर्षीय विकृत आपल्या सख्ख्या आईवरच मागील तीन महिन्यापासून बलात्कार करत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, पिडीत महिलेच्या पतीचे मागील सात वर्षापूर्वी निधन झालेले आहे. तिने मोठ्या कष्टाने आपल्या चार अपत्यांना मोठे केले. त्यातील दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत. तर बलात्कार करणारा विकृत हा दारूच्या आहारी गेला आहे.मागील अनेक दिवसापासून तो दारूसाठी पैसे द्यावेत म्हणून आईला मारहाण करीत होता. तसेच बहीण घरी आली तर तिलाही पैशांसाठी मारहाण आणि शिवीगाळ करीत होता. संतापजनक म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून तर त्याने आपल्या आईलावर बलात्कार करायला सुरुवात केली होती. भीती आणि आपली बदनामी होईल या चिंतेने ती माता अत्याचार सहन करीत आली. या मंगळवारी दुपारीही त्याने घरात एकटी असलेल्या आईवर मारहाण करीत आणि धमक्या देत अत्याचार केले. त्यानंतर मात्र तिने हिंमत करून बुधवारी सकाळी आठ वाजताच पोलिस ठाणे गाठत सर्व हकीगत सांगत फिर्याद नोंदवली. सिडको पोलिसांनी विकृत मुलाला अटक केली आहे.


Protected Content

Play sound