Home क्राईम जळगावातील मार्केटमधुन भरदिवसात टॉप्सचे गठ्ठे चोरी

जळगावातील मार्केटमधुन भरदिवसात टॉप्सचे गठ्ठे चोरी


जळगाव प्रतिनिधी । गजबजलेल्या फुले मार्केटमधील एका हॉकर्सने हातगाडीवर ठेवलेले टॉप्सचे गठ्ठे चोरीस गेल्याची घटना शनिवारी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

ऋषीकेश सुरेश पवार यांच्या मालकीचा हा माल होता. पवार हे महिलांचे टॉप्स विक्री करतात. सध्या फुले मार्केटमध्ये अतिक्रमण हटवलेले असल्यामुळे
दुकान लावता येत नाही. शनिवारी पवार यांनी एका दुकानदाराच्या मदतीने दुकानाच्या आत टॉप्स विक्रीसाठी ठेवले होते. काही गठ्ठे बाहेर असलेल्या
हातगाडीवर ठेवले होते. दुपारच्या वेळी चोरट्यांनी हे गठ्ठे लांबवले. दरम्यान, हातगाडी उभी असलेल्या ठीकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ही घटना स्पष्ट झाली नाही. पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound