जळगाव, प्रतिनिधी | रोटरी क्लब आँफ जळगाव ईस्टतर्फे उद्या (दि.८) अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी ८.०० वाजता जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले आहे.
रोटरी क्लब आँफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी नुकतीच विनोद पाटील (भोईटे) यांची निवड झाली आहे. ते कळमसरे येथील मूळ रहिवासी आहेत. आपल्या मूळ गावातील आणि पंचक्रोशीमधील गरजू रुग्ण, ग्रामस्थांना गावपातळीवरच आरोग्य सेवा मिळावी, अशा हेतूने या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. चांडक नेत्रविकार तज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ डाँ.अमय कोतकर, दंतरोग तज्ज्ञ डाँ.राहुल भंसाळी, न्युरोलाँजीस्ट राहुल चिरमाडे, स्रीरोग तज्ज्ञ श्रद्धा चांडक, डाँ.सुमन लोढा, बालरोग तज्ज्ञ डाँ.अमोल शेठ, सर्जन डाँ.जगमोहन छाबडा, अस्थिरोग तज्ज्ञ डाँ.मनीष चौधरी, डाँ.पंकज गुजर, नेत्ररोग तज्ज्ञ डाँ.पंकज शहा, मयुरी पवार, तसेच डाँ.श्रीधर पाटील आदी मान्यवर डॉक्टर्स रुग्णांची आरोग्य तपासणी करतील. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी क्लबचे सचिव वीरेंद्र छाजेड, मेडीकल कमिटीचे चेअरमन डाँ.श्रीधर पाटील, संजय गांधी, संजय शहा, संजय भंडारी, संग्राम सिंग आदी परिश्रम घेत आहेत. तरी गाव व परिसरातील गरजूंनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.