जळगाव प्रतिनिधी । चित्तपावन स्नेह मंडळ व ब्राह्मणसभा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सरिता अभ्यंकर स्मृती खुली मराठी गीतगायन स्पर्धेचे आयोजन दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील ब्राह्मणसभा, बळीरामपेठ येथे घेण्यात येणार आहे.
यंदाचे स्पर्धेचे १८ वे वर्ष असून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी प्रथम गट वय १० ते १६ वर्षे, द्वितीय गट १७ ते ३२ वर्षे असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक स्मृतिचिन्ह व रोख रक्कम १५०० रुपये, द्वितीय पारितोषिक स्मृतिचिन्ह व रोख रक्कम १,००० रुपये अशा स्वरूपात असतील. आणि दोन्ही गटात मिळून उत्तम गायक आढळल्यास त्यास विशेष पुरस्कार देण्यात येईल. स्पर्धा संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेसाठी महत्त्वाचा अटी
१)प्रत्येक स्पर्धकास आपल्याच वयोगटात भाग घेता येईल. त्यासाठी स्पर्धकास जन्मतारखेचा दाखला अथवा आधारकार्ड झेरॉक्स अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
२)प्रत्येक विभागात किमान ६ स्पर्धक असल्यासच त्या विभागात स्पर्धा घेतली जाईल.
३)प्रत्येक स्पर्धकासाठी प्रवेश मूल्य ३०/- मात्र राहील. प्रवेश अर्ज भरून (दि.२३ डिसेंबर पूर्वी पोहचेल अशा रीतीने खालीलपैकी एका ठिकाणी सादर करावा. अंतिम मुदतीनंतर प्रवेशअर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)