Home क्राईम तरुणीचा विनयभंग; शेंदुर्णीत तणाव

तरुणीचा विनयभंग; शेंदुर्णीत तणाव


शेंदुर्णी ता.जामनेर ( वार्ताहर) येथे काल ( गुरुवार ) सायंकाळी एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग करून हात धरत तिला लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याने वाद निर्माण झाला होता. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दोन्ही गटात पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान मुख्य आरोपीसह काही जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी घरकाम करणारी एक तरुणी काम आटोपून आपल्या घराकडे परत जात असताना हमीद दादामिया खाटिक याने तिला रस्त्यात अडवून तिचे नाव विचारले व हात धरून तिचा विनयभंग केला. त्यावेळी सदर तरुणीने स्वत:ची सुटका करून घेतली. त्यांनतर ती घराकडे जात असताना हमीद यांने तिचा पाठलाग केला व कुणाला माझे नाव सांगितल्यास चाकूने ठार मारण्याची धमकी दिली. तसेच १५-२० लोक घेऊन फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली. त्याचवेळी हमीद याची बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार रस्त्याने जात असताना हमीद याचा सदर तरुणीस धक्का लागल्याने तिने वाद करून श्याम गुजर व इतर काही जणांना बोलावून दहशत निर्माण केली, असे म्हटले आहे. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्या असल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound