Home धर्म-समाज भुसावळ वकिल संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

भुसावळ वकिल संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

0
50

bhusaval vakil sangh

 

भुसावळ प्रतिनिधी । तालुका वकिल संघ व न्यायाधिश यांच्या कडून महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.पी. डोरले यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर न्यायाधिश भंसाली, चौखंडे, विहारे, सावळे, अहिर त्याचप्रमाणे शिंदे मॅडम, चिद्रे, शुल व मानकर यांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली.भुसावळ वकिल संघाचे सभासद अॅड. नितीन रजाने, अॅड.आय.आय.खान, अॅड.एम.एस.सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे वेळी भुसावळ वकिल संघाचे पदाधिकारी अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, उपाध्यक्ष अॅड. धनराज मगर, सचिव रम्म पटेल, सह सचिव पुरुषोत्तम पाटील, कोषाध्यक्ष अॅड. राजेश कोळी, महिला प्रतिनीधी अँड. जास्वंदी भंडारी तसेच ग्रंथपाल अॅड. संजय तेलगोटे व अन्य वकिल सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. रम्म पटेल यांनी केले तर अॅड. जास्वंदी भंडारी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


Protected Content

Play sound