Home क्राईम हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव ; महिलांनी बांधली राखी

हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव ; महिलांनी बांधली राखी


ELFFvXUUEAAcVek
 

हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबाद निर्भया प्रकरणात बलात्काऱ्यांचे एन्काउंटर करणाऱ्या पथकातील पोलिसांना महिलांनी राखी बांधलीय. तर दुसरीकडे पोलिसांना खांद्यावर उचलून नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

 

एन्काउंटर ठिकाणावरून परत येणाऱ्या पोलिसांच्या स्वागतासाठी स्थानिकांनी गर्दी केली. तसेच नाचत गात त्यांना खांद्यावर उचलून आणले. दरम्यान, काहींनी आपल्या घरांच्या छतांवरून फुले आणि फुलांच्या पाकळ्या बरसावून पोलिसांचे स्वागत केले. तर काही महिलांनी हैदराबाद पोलिसांना राखी बांधून आपला आनंद व्यक्त केला. एका ठिकाणी महिलांनी पोलिसांना पेढे भरवले. देशभरातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound