Home क्राईम हैदराबादच्या ‘त्या’ चारही नराधमांचे एन्काऊंटर

हैदराबादच्या ‘त्या’ चारही नराधमांचे एन्काऊंटर

0
21

firing

हैदराबाद वृत्तसंस्था । येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक तरूणीवर सामूहिक बलात्कार करून तिची क्रूर हत्या करणार्‍या चारही आरोपींनी फरार होण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर त्यांना एन्काऊंटर करून ठार करण्यात आल्याची घटना आज पहाटे घडली.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच हैदराबाद शहरातील एका व्हेटर्नरी डॉक्टर महिलेची स्कूटी पंक्चर झाल्यानंतर तिच्यावर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. यात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या चारही आरोपींना आज पहाटे घटनास्थळाची ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले होते. यावेळी त्या चारही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनी त्यांचे एन्काऊंटर करून त्यांना जागीच ठार केले.


Protected Content

Play sound