जळगाव प्रतिनिधी । शहरातील पब्लिक स्कूलमध्ये उल्का फाऊंडेशनतर्फे चित्रसंस्कार अभियान नुकतेच राबविण्यात आले आहे.
हे अभियान उल्का फाऊंडेशनतर्फे मोफत राबविण्यात येत असून चित्रसंस्कार अभियानात चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अभियानात विद्यार्थ्यांना कागद काम आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्षिक देण्यात आले असून विद्यार्थ्यांनीही आपल्या कृतीतून सहभाग नोंदविला. या अभियानात रेनबो ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेसच्या दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील यांनी भरभरुन कौतुक केले.
अभियानाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षिका हर्षा पाटील, मनीषा पाटील आणि कविता चौधरी यांचे सहकार्य लाभले.