आयसीसीच्या बैठकीत जय शहा करणार बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व

jay shaha

मुंबई वृत्तसंस्था । केंद्रिय गृहमंत्री आणि बीसीसीआयच्या सचिव पदी विराजमान झालेले अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यानुसार आयसीसीच्या बैठकींमध्ये यापुढे जय शहा हे बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत.

२३ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळली. याचवेळी जय शहा यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली. रविवारी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुलीने, आयसीसी बैठकीत जय शहा बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करेल असे स्पष्ट केले होते. सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयची सुत्र येण्याआधी, सर्वोच्च न्यायालयाची क्रिकेट प्रशासकीय समिती बीसीसीआयचा कारभार सांभाळत होती. त्यामुळे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आयसीसी बैठकीत बीसीसीआयची बाजू मांडत होते. मात्र संघटनेच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर आता ही जबाबदारी जय शहांकडे आली आहे.

Protected Content