नाशिक प्रतिनिधी । माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे आज पहाटे उपचारा दरम्यान निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे (वय ७७ ) यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णलयात उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सन १९८५ ते १९९९ पर्यंत सलग १५ वर्ष आमदार राहिले. युतीच्या काळात ९५ ते ९९ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ऊर्जा, ग्राम विकास मंत्री. जिल्हा बँकेचे माजी संचालक आदी पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिजित, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.