Home Cities भुसावळ महाविकासआघाडीच्या माध्यमातून राज्याचा विकास होणार – प्रभाकर सोनवणे (व्हिडीओ)

महाविकासआघाडीच्या माध्यमातून राज्याचा विकास होणार – प्रभाकर सोनवणे (व्हिडीओ)


bhusawal news2

भुसावळ प्रतिनिधी । भाजपाने सत्ता स्थापन करून विकासाला खोडा घतला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा महाविकास आघाडीला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. यात शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार स्थापन झाल्यानंतर तिनही पक्षाच्या वतीने तळागाळातील व्यक्तींच्या भवितव्यासाठी आणि राज्यात विकासाची कामे करून एक आदर्श महाराष्ट्र म्हणून नाव मिळविणार असल्याचे मत भुसावळातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.

आगामी काळात महिलांचे रक्षण, तरूणांची बेरोजगारी कमी, कामागारांच्या हाताला काम, शिक्षण या मुलभूत गोष्टी येत्या कार्यकाळात कामे चांगल्या रितीने होईल, लवकरच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच्या रूपाने राज्याच्या विकासाला चालणा मिळणार असल्याचेही देखील श्री.सोनवणे यांनी सांगितले.


Protected Content

Play sound