Home क्राईम जळगावात बंद घर फोडले; 40 हजाराचा ऐवज लंपास

जळगावात बंद घर फोडले; 40 हजाराचा ऐवज लंपास


robbary clipart

जळगाव प्रतिनिधी । आजाराच्या उपचारासाठी शिर्डी येथे गेलेल्या महिलेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागीने असे एकुण 40 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, जमीलाबी शेख इस्माईल (वय-54) रा. पुजा बेंटेक्स दुकानाच्या समोर, बिसमिल्ला चौक, तांबापूरा हे घरात एकट्याच राहतात. त्या आजारी राहत असल्याने त्यांचे उपचार शिर्डी येथे सुरू असतात. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घराला कुलूप लावून शिर्डी येथे उपचारासाठी गेल्या होते. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी घराच्या बाजूला राहणारे रहिवाशी यांनी फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी वेगळा राहणार मुलगा फारूख याला घरी जावून तपासणी करण्यास सांगितले. आज सकाळी त्या घरी आल्यानंतन त्यांनी तपासणी केली असता घरात ठेवलेले 25 हजार 400 रूपये रोख, 3 हजार रूपये किंमतीची 2 ग्रॅम सोन्याची अंगठी, 9 हजार रूपये किंमतीची 6 ग्रॅम सोन्याची पोत आणि 3 हजार रूपये किंमतीचे पितळ्याची भांडे असे एकुण 40 हजार 400 रूपयांचा मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound