मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून ते पत्रकार परिषदेत याची घोषणा करू शकतात.
आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमताची जुळवाजुळव करणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमिवर, अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून यात ते आपल्या पदाचा राजीनाम्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.