नवी दिल्ली प्रतिनिधी । बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) १८ आणि २१ मार्च २०२० रोजी वर्ल्ड इलेव्हनविरुद्धच्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटूंची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह ७ खेळाडू देण्यात यावे, अशी मागणी बीसीबीने केली आहे.
बांगलादेश संघासाठी भारतीय दौरा विशेष खास नव्हता. टी-२० मालिकेत परभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यातही बांगलादेशला क्लिन स्विप दिला. दोन्ही कसोटी सामन्यात बांगलादेशला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. ऐतिहासिक डे-नाईट सामन्यातही भारताचेच वर्चस्व राहिले. एकाही दिवशी बांगलादेशच्या संघाला टीम इंडियाला टक्कर देता आली नाही. त्यामुळे दोन्ही सामना तिसऱ्या दिवशीच संपले. या पराभवनंतर बांगलादेशच्या संघाने बीसीसीआयकडे एक वेगळीच मागणी केली आहे. बांगलादेशने टीम इंडियातील सात खेळाडू मागितले आहेत.
इंग्लंडमधील विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला धोनी यामुळे पुन्हा एकदा आयपीएलपूर्वीच मैदानात दिसू शकतो. पण यासाठी बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची असेल. बीसीबीने पाठवलेल्या प्रस्तावात धोनीसह विराट कोहली, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जाडेजाचेही नाव आहे.