सावदा प्रतिनिधी । राहत्या घरात प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी सावदा येथे घडली. याप्रकरणी सावदा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रमोद हरी बखाल (वय-38) रा. सावखेडा खु ॥ हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज त्यांनी राहत्या घरात कोणीही नसतांना लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप बखाल यांच्या खबरीवरून सावदा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ युसूफ अमीर तडवी करीत आहे.