Home ट्रेंडींग भारतात लाँच झाले ‘गुगल नेस्ट मिनी’ स्मार्ट स्पीकर

भारतात लाँच झाले ‘गुगल नेस्ट मिनी’ स्मार्ट स्पीकर

0
69

Google Nest Mini launches smart speaker in India

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गुगलने आज भारतात आपला नवीन मिनी स्मार्ट स्पीकर “गुगल नेस्ट मिनी’ लाँच केला आहे. गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकरची भारतात किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर याची विक्री होणार आहे. गुगल नेस्ट दोन वर्षांपुर्वी लाँच झालेल्या गुगल होम मिनीचे अपग्रेटेड व्हर्जन आहे.

गुगल होम मिनीच्या तुलनेत गुगल नेस्ट मिनीतील काही डिजाइन व स्पेसिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. तसेच, पॉवर कनेक्टर आणि केबल दिली आहे. गुगल नेस्टचं डिजाइन गुगल होम मिनीशी काही प्रमाणात मिळते जुळती आहे. नव्या डिजाइनमध्ये मायक्रोफोन स्लायडर स्विच आणि फॅब्रिक टॉप कव्हरच्या खाली लाइट्स देण्यात आल्या आहेत. नेस्ट मिनीच्या स्पीकरचा आवाज इतर स्पीकरपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावा गुगलने केला आहे. यासाठी डिव्हाइसमध्ये डेडिकेटेड मशीन लर्निंग चिप बसवण्यात आली आहे. गुगलचे हे स्पीकर भारतात चॉक आणि चारकोल या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे भारतातील सर्वात प्रमुख म्युझिक सर्व्हिसना सपोर्ट करतात. नेस्ट मिनीची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. गुगल नेस्ट मिनी स्पीकर फ्लिपकार्टवरून ग्राहक खरेदी करु शकतात


Protected Content

Play sound