राष्ट्रवादीचे पाच आमदार ‘नॉट रिचेबल’- मलीक

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी फक्त पाच आमदार ‘नॉट रिचेबल’ असून उर्वरित सर्व पक्षासोबत असल्याची माहिती आज पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू असतांना पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आमच्या ५४ पैकी फक्त पाच आमदार ‘नॉट रिचेबल’ आहेत. उर्वरित सर्व आमदार पक्षासोबत आहेत. यात अजून अन्य आमदार येऊ शकतात असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तर पक्षाच्या नेतेपदाचे अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केलो. तर आपण भाजपला विधानसभाध्यक्ष निवडणुकीतच हरवू असा दावादेखील केला आहे.

Protected Content