
मुंबई प्रतिनिधी । खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाटसअॅप स्टेटसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फुट पडल्याचे जाहीर केले आहे.

सुप्रीया सुळे या व्हाटसअॅप स्टेटसचा चपखल वापर करतात. आज सकाळी त्यांनी स्टेटस् बदलून पार्टी अँड फॅमिली स्प्लीटस् असे स्टेटस ठेवले आहे. यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडली असून यामुळे आता पवार कुटुंबातही फुट पडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिल्याचे मानले जात आहे.


