चाळीसगावात सर्प मित्राने विषारी सापास सोडले जंगलात

WhatsApp Image 2019 11 22 at 18.07.54

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील दुध सागर मार्ग परिसरातील बीएसएनएल ऑफिस समोर असलेल्या अभय वाघ यांच्या दत्त डेअरीच्या स्टोअर रूममध्ये जवळपास ५ ते ६ फुटांचा अत्यंत विषारी नाग आढळून आला होता तो नाग सर्प मित्राने पकडून तो जंगलात सोडला.

आज दुपारी दत्त डेअरीच्या स्टोअर रूममध्ये नाग निघाल्याने डेअरी मालक व कामगार यांची भीतीने तारांबळ उडाली होती. ही माहिती बेलगंगा साखर कारखान्याचे विश्वस्त निलेश निकम यांनी मोबाईलवरून शहरातील पंचशिल नगर स्थित सर्पमित्र मयुर चंद्रकांत कदम यांना दिली. कदम यांनी मोठ्या शिताफीने डेअरीच्या स्टोअररूममध्ये असलेला विषारी नाग पकडून त्यास जंगलात सोडुन दिला. त्याच्या सोबत यशोदिप रणधीर होते. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सरदारशेठ राजपुत, हेमराज डेअरीचे हरीष पल्लन, डेअरी मालक अभय वाघ आदि उपस्थित होते. मयुर कदम यांना कोणीही फोन केल्यास ते तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने विषारी सर्फास पकडतात व विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सर्प पकडला तेथुन कुठलीही आर्थीक अपेक्षा न ठेवता त्याच ठिकाणी असलेल्या कुणाच्याही वाहनावर जाऊन बरणीत बंद असलेल्या सर्पास सर्वांसमक्ष जंगलात सोडतात. त्यांच्या या धाडसी कामाचे सर्वत कौतुक होत आहे.

Protected Content