Home क्राईम माथेफिरुचा 7 जणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक

माथेफिरुचा 7 जणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक

0
112

रत्नागिरी (वृत्तसंस्था) लांजा तालुक्यातील देवधे येथे एका माथेफिरु तरुणाने तब्बल सात जणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यातील जखमींमध्ये पाच वर्षाच्या बालकाचाही समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

या माथेफिरुने कोयत्याने सर्व 7 जणांच्या मानेवर, हातावर, डोक्यावर वार केल्याने हे सर्वजण रक्तबंबाळ झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर हा तरुण स्वतः पोलीस स्थानकात झाला दाखल.जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. हल्ल्यातील जखमींना पुढील उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्यात आले आहे.


Protected Content

Play sound