जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील खरीप 2018 या कालावधीत घेतलेल्या पिक विमा योजनेतील 181 शेतकरी यांना विमा काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप पावतो मिळालेला नाही. त्यामुळे पिक विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, अशी मागणी माननीय एकनाथराव खडसे माजी मंत्री महसूल व माननीय खासदार रक्षाताई खडसे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे चेअरमन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील खरीप 2018 या कालावधीत घेतलेल्या पिक विमा योजनेतील 181 शेतकरी यांना विमा काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप पावतो मिळालेला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रोहिणी ताई खडसे व एकनाथराव खडसे यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. परंतु ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी अद्यापपर्यंत विमा रक्कम शेतकरी यांच्याकडे पाठवलेले नाही. यासंदर्भात माननीय एकनाथराव खडसे माजी मंत्री महसूल व माननीय खासदार रक्षाताई खडसे यांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी विमा कंपनीचे चेअरमन गिरजा कुमार व जनरल मॅनेजर सौम्या यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन विमा कंपनीकडून तात्काळ शेतकऱ्यांच्या खाते विमा रक्कम जमा करण्याची विनंती केली. यावेळी जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व सरव्यवस्थापक एमटी चौधरी हे हजर होते.