चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील मामलदे गावात गोपाळ महाजन यांच्या शेतात दि.१४ रोजी एक जखमी अवस्थेत माकड आले होते. त्या माकडाचा अखेर शेतातच दुर्दैवी अंत झाला असून माकडाची अंत्ययात्रा काढत ग्रामस्थांकडून शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आला. यानंतर माकडाचा अंत्यविधी उत्तरकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या दि.२३ नोव्हेंबर रोजी दशक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मामलदे येथील रहिवासी गोपाळ राजाराम महाजन यांच्या शेतात बजरंग बलीचा अवतार असलेले माकडे पुर्णत्व जखमी होऊन आले होते. परंतू त्या माकडाचे शेतात गतप्राण झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी तोबा गर्दी केली. गावकऱ्यांनी भाऊक होऊन माकडाचा अंत्यविधी, उत्तरकार्य, दशक्रिया विधी करण्याचे एक मुख्य निर्णय घेण्यात आला. अंत्यविधीसाठी डोली सजविण्यात आली. माकडाच्या पार्थिवावर अनेकांनी फुलमाळा व शाल अर्पण केली.
माकडाला मुखाग्नि देण्यासाठी सुरेश महाजन यांनी पुढाकार घेतला. तसेच बारा दिवसाच्या संपूर्ण गावावर दुखवटा असल्याने गावात रोज रात्री भजन करण्यात येत आहे. येत्या दि.२३ रोजी दशक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. दशक्रियाच्या विधीत अनेकजण केस देणार असून दि.२५ ला संपूर्ण गावाला उत्तरकार्यानिमित्त जेवण ठेवण्यात आले आहे.
याकार्यक्रमासाठी गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीने सहभाग घेतला आहे. या कार्यासाठी गावातील भारत इंगळे, अनिल पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, विजय पाटील, खुशाल पाटील, पुंडलिक पाटील, कल्याण पाटील, चंपालाल पाटील, शांताराम पाटील, प्रल्हाद पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सुनील पाटील, चंद्रकांत महाजन यांचासह आदिंनी अथक मेहनत घेत आहेत.