Home क्राईम राजस्थानमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; १० जण जागीच ठार

राजस्थानमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; १० जण जागीच ठार


Accident
 

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या बिकानेर येथे आज सकाळी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल १० प्रवाशी जागीच ठार तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

 

आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बस बिकानेरहून जयपूरकडे जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रक आणि बसची धडक इतकी भीषण होती की, बस ट्रकमध्ये घुसली होती. या भीषण अपघातात 10 प्रवाशी जागीच ठार तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, दोघं वाहनांनी एकमेकाला धडक दिल्यानंतर पेट घेतला. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत आग विझवली. मात्र यात बसमधील अनेक प्रवासी भाजले गेले होते.


Protected Content

Play sound