Home क्राईम रायगडमधील कंपनीत भीषण स्फोट ; 18 जण भाजले

रायगडमधील कंपनीत भीषण स्फोट ; 18 जण भाजले

0
101

blast
 

रायगड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिकीक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि.कंपनीत आज दुपारी झालेल्या भीषण स्फोटात 18 जण भाजले आहेत. या स्फोटामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

 

आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास क्रीपझो प्रा. लि.कंपनीत अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 18 जण भाजून जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर भाजले आहेत. सध्या त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.


Protected Content

Play sound