Home क्राईम एमआयएम नगरसेवकाकडून मारहाण ; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

एमआयएम नगरसेवकाकडून मारहाण ; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0
50

aa b l le l l 1564687624
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरात कचरा संकलन करणाऱ्या खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍यांना एमआयएमच्या नगरसेवकाने मारहाण केल्यामुळे कामगार संतप्त झाले असून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. नगरसेवक अबुल हसन हाश्मी याने ही मारहाण केली आहे.

औरंगाबाद आमखास मैदान जवळ खुल्या जागेत कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या मोठ्या गाड्या लावण्यात येतात. त्यात असलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरत असल्याचा त्याचे म्हणणे होते. यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याचे हमरीतुमरी झाली आणि यात या नगरसेवकांनी या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर कंपनीने नगरसेवकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले. संतप्त झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद सुरु केले आहे.


Protected Content

Play sound