मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नसतानाही संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेने हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. अशातच आपल्या आमदारांसोबत बैठक घेण्यापूर्वी पवार यांनी राऊत यांची भेट घेतलीय. यावेळी पवार यांच्यासोबत रोहित पवार हेदेखील उपस्थित होते.