Home राजकीय काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय घेणार- जयंत पाटील

काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय घेणार- जयंत पाटील

0
38

jayant patil

मुंबई प्रतिनिधी । सत्ता स्थापनेबाबत आपण काँग्रेस पक्षाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री दिली.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. ही बैठक सुरू असतांनाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. ते म्हणाले की, राज्यपालांनी आम्हाला निमंत्रण दिल्यानुसार आम्ही त्यांची भेट घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी आमचा सहकारी पक्ष असणार्‍या काँग्रेससोबत चर्चा करून मगच निर्णय घेण्यात येणार आहे. आम्हा दोन्ही पक्षांना एकत्रीतपणे फक्त ९८ जागा मिळाल्या असून त्या सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा नाहीत याची जाणीव आम्हाला आहे. या मुळे सत्ता स्थापन करण्याच्या पर्यायांवर आम्ही चर्चा करणार आहोत. उद्या आमच्या पक्षाची बैठक होणार असून नंतर काँग्रेस सोबत बैठकदेखील होणार आहे. यानंतर आम्ही राज्यालांची भेट घेणार असल्याची माहितीदेखील जयंत पाटील यांनी याप्रसंगी दिली.


Protected Content

Play sound