Home Cities जळगाव भुसावळ टपाल विभागात डाकसेवकांची भरती

भुसावळ टपाल विभागात डाकसेवकांची भरती


post office sign
 

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय टपाल विभागांतर्गत भुसावळ विभागात ग्रामीण डाक सेवकांची ऑनलाईन पध्दतीने भरती प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. भुसावळ विभागात रिक्त 79 ग्रामीण डाक सेवकांची भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने इच्छूक उमेदवारांना 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत अर्ज भरता येतील.

भरती प्रक्रीयेतील एकूण 79 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी – 32, अनु.जाती- 06, अनु.जमातीसाठी- 07, इतर मागासवर्गींसाठी- 23, ईडब्ल्यूएससाठी-08 आणि अपंगांसाठी-03 अशाप्रकारे जागा आरक्षित आहेत. भरतीसाठी अर्जदारांना http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. यात महिलांसाठी परीक्षा शुल्क नसून फक्त खुला वर्ग, ओबीसी व आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 100 रपये परीक्षा शुल्क असल्याचे अधिक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound