Home Cities भुसावळ दीपनगर येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा

दीपनगर येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा


deepnager program

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथील लेखक, दिग्दर्शक, हौशी नाट्य कलावंत आणि रंगभूमीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वच तंत्रज्ञांनी एकत्र येऊन मंगळवारी सायंकाळी ‘मराठी रंगभूमी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व प्रमुख अतिथी स्थान मुख्य अभियंता पंकज सपाटे व विवेक रोकडे यांनी भूषविले. यावेळी विवेक रोकडे, मु.अ. प्रकल्प१x६६०, नितीन पुणेकर, उप.मु.अ., संजय पखान, का.अ., चंद्रकांत सपकाळे, राजेश पवार, नितिन देवरे, अतुल बरहाटे, राकेश सातोटे, रोशन वाघ, संजय लोकरे, सोपान चौधर, अश्विन शेखरवार, आप्पा राठोड, विवेक राऊत, योगराज चौधरी, श्रध्दा कदम, ऐश्र्वर्या खोसे, शामल जाधव व बाल कलाकार विभुती यांनी नटराज पुजन केले. विवेक रोकडे यांनी उपस्थित कलावंतांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.


Protected Content

Play sound