जळगाव, प्रतिनिधी | सुवर्णनगरी म्हणून लौकिक असलेल्या जळगाव नगरीत ‘भंगाळे गोल्ड’ या नावाने सुरु झालेल्या फर्मने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. लवकरच या दालनात हिरे विक्रीसाठी नवे कक्ष सुरु करण्यात येणार असून भविष्यात अविरतपणे ग्राहक सेवा सुरूच राहणार असल्याची ग्वाही या फर्मचे संचालक भागवत भंगाळे, अर्जुन भंगाळे व सागर भंगाळे यांनी आज (दि.५) एका पत्रकार परिषदेत दिली.
५ नोव्हेंबर २०१७ रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘भंगाळे गोल्ड’ हे दालन ग्राहकांच्या सेवेत रूजू झाले होते. वास्तविक पाहता, जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ख्यात असून येथे आभूषणे आणि रत्ने खरेदी करण्यासाठी देशभरातून ग्राहक येत असतात. अशा या सुवर्णाच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत केवळ दोन वर्षात या फर्मने ग्राहकसेवेचा एक नवा अध्याय निर्माण केला आहे. शुध्द सोने, उत्तमोत्तम डिजाईन्सचे पर्याय, वाजवी दर आणि अत्युच्च दर्जाची सेवा या शिदोरीवर ‘भंगाळे गोल्ड’ने एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून ख्याती मिळवली आहे.
दागिने, आभूषणे आदींमध्ये अलीकडच्या काळात आलेले नवनवीन ट्रेंडस्, ग्राहकांचा बदलता कल लक्षात घेऊन भंगाळे गोल्डमध्ये वैविध्यपूर्ण दागिने उपलब्ध आहेत. हे दालन अतिशय प्रशस्त जागेत असून येथे ग्राहकांना प्रसन्न वातावरणात खरेदीचा आनंद घेता येतो. बाजारपेठेत कुठेही उपलब्ध नसणार्या डिझाईन्स येथे उपलब्ध असून त्या ग्राहकांना पसंतीस उतरल्या आहेत. याचसोबत या दालनाने ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजनाही सादर केल्या आहेत. त्यानाही उदंड प्रतिसाद लाभला आहे, सध्या भंगाळे गोल्डला दोन वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्राहकाला त्याने केलेल्या खरेदीसोबत सोने जिंकण्याची अभूतपुर्व संधी प्रदान करण्यात आलेली आहे. ही योजना १५ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
लवकरच सोने-चांदीसह हिरे विक्रीसाठी दालनात नवे कक्ष सुरु करण्याचा मानस आहे. या फर्ममध्ये केवळ हॉलमार्कने प्रमाणित असलेले दागिनेच विक्री केले जातात, तसेच सध्या शाखा विस्तार करण्याचा विचार नसला तरी भविष्यात गरजेनुसार नक्कीच शाखा विस्तार केला जाईल, अशी माहितीही यावेळी फर्मच्या संचालकांनी दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/485858392027581/