पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज (दि.२) तहसीलदारांना निवेदन देवून तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पंचनामे करून शासनाने हेकटरी 50,000 हजार रुपये अनुदान दयावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना छावाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, शेतकरी अध्यक्ष अविनाश मराठे, तालुका उप अध्यक्ष विनोद पाटील, ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, मनोज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील यांचायासह छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.