वक्त के सागर मे कई सिकन्दर डूब गए…संजय राऊत यांचे ट्विट

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं सिकन्दर डूब गए..!, अशा आशयाचे ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर वार केला आहे.

 

भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या लढाईमध्ये शिवसेनेच्या बाजूने नेटाने किल्ला लढवणारे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज एक सूचक ट्विट केले आहे. ‘साहिब, मत पालिए, अहंकार को इतना… वक्त के सागर मे कई सिकंदर डूब गए…!’ हा शेर त्यांनी ट्विट केला आहे. ‘इतके अहंकाराने वागू नका… वेळेच्या समुद्रात भलेभले बुडालेत… असे त्यांनी या शेरच्या माध्यमातून सुचवले आहे. राऊत यांनी कोणाचाही उल्लेख केला नसला तरी मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या भाजपकडेच त्यांचा रोख असल्याचे स्पष्ट आहे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून आपल्याला १४० जागा मिळतील, असा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला अवघ्या १०५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे एकहाती सत्ता स्थापन करून शिवसेनेला काबूत ठेवण्याचे भाजपचे मनसुबे उधळले गेले होते.

Protected Content