Home आरोग्य धनवंतरी पुरस्काराने डॉ. हेमंत बऱ्हाटे यांचा गौरव (व्हिडीओ)

धनवंतरी पुरस्काराने डॉ. हेमंत बऱ्हाटे यांचा गौरव (व्हिडीओ)

0
135

nivad bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथील रहिवासी असलेले व यावल येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवारत असलेले डॉ. हेमंत भाऊराव बऱ्हाटे यांना धनत्रयोदशीच्या पर्वावर भुसावळ वैद्यक मंडळातर्फे धन्वंतरी पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. हेमंत भाऊराव बऱ्हाटे हे गेले 10 वर्षापासून यावर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून वैद्यकीय सेवा बजावत असून यापूर्वी त्यांनी पडळसा, थोरगव्हाण, भालोद, वराडसिम, भा, बोदवड या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या घराण्याला वैद्यकीय सेवेचा वारसा असून त्यांचे आजोबा अधिरामजी बऱ्हाटे ही नामांकित वैद्य होते. हीच परंपरा डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी कायम ठेवून वैद्यकीय सेवेचे व्रत अंगिकारले आहे.


Protected Content

Play sound