Home क्रीडा जळगावात फुले मार्केटमधून महिलेची पर्स लांबविली

जळगावात फुले मार्केटमधून महिलेची पर्स लांबविली


जळगाव प्रतिनिधी । फुले मार्केट येथे खरेदीसाठी आलेल्या ज्योती पुरोहित (रा. शनीपेठ) या महिलेची अज्ञात चोरट्याने सुमारे १४ हजार रूपयांचा मुद्देमाल असलेली पर्स चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ येथील ज्योती पुरोहित या फुले मार्केट येथे शुक्रवारी दुपारी खरेदीसाठी आल्या होत्या़ दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबविली़ या पर्समध्ये ५ हजार रूपयांची रोकड, ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल तसेच ४ हजार ५ रूपये किंमतीचा सोन्याचा शिक्का असा मुद्देमाल होता़ पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पूढील तपास बशीर तडवी हे करित आहेत.


Protected Content

Play sound