Home Cities भुसावळ आ. संजय सावकारे यांची विजयी वाटचाल

आ. संजय सावकारे यांची विजयी वाटचाल

0
66

sanjay savkare

भुसावळ प्रतिनिधी । पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असणारे आमदार संजय सावकारे यांना आता निर्णायक आघाडी मिळाली असून ते विजयाकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार संजय सावकारे यांना महाआघाडीचे जगनभाई सोनवणे, अपक्ष डॉ. मधू मानवतकर आणि अपक्ष सतीश घुले यांनी आव्हान दिले होते. यात संजय सावकारे यांची बाजू पहिल्यापासून मजबूत मानली जात होती. विशेष करून नाथाभाऊंच्या संकटकाळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्याचा सावकारेंना लाभ होणार असल्याचे मानले जात होते. या पार्श्‍वभूमिवर, टपाली मतगणनेपासून ते आघाडीवर होते. आता त्यांना दहा हजारांपेक्षा जास्त आघाडी मिळाली असून विद्यमान ट्रेंड पाहता संजय सावकारे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.


Protected Content

Play sound