जळगाव, प्रतिनिधी | जागतिक जुनियर बुद्धिबळ स्पर्धेत साऊथ आफ्रिकेतील डू पलेसिस अनीका जैन स्पोर्ट्स अकॅडमी भाग्यश्री पाटील कडून पराभूत
केले आहे. या स्पर्धत ३९ देशातील ९४ मुलीनी सहभाग घेलता आहे.
रविवार ( दि. 20) रोजी दिल्ली हॉटेल लीला अंबिएन्समध्ये होत असलेल्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या भाग्यश्री पाटील हिने साउथ आफ्रिकेची वुमन इंटरनॅशनल मास्टर डू प्लीसिस अनिका इस पराभूत केले. या स्पर्धेत भाग्यश्रीचे सहा फेरीअखेर दोन विजय एक बरोबरी तीन पराभुत असे अडीच गुण झाले आहेत व तिचे फिडे रेटिंग 42 ने वाढत आहे. सातवीफेरी तिची रशियाची तमारोझी इसाबेल्ली सोबत आहे. अजून स्पर्धेच्या पाच फेऱ्या बाकी आहेत. या स्पर्धेत ३९ देशातील ९४ मुलींचा सहभाग आहे. भाग्यश्रीच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा पाठविल्या आहेत.