चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील तितूर नदीला शनिवारी अचानक पूर आला. या पुराचे पाणी नदी शेजारील असलेल्या अनेक दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मंगेश चव्हाण यांनी तात्काळ पाहणी केली.
चाळीसगाव शहरातील तितुर नदीला अचानक पूर आल्याने नदी शेजारील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी गेले. काल रात्री मंगेश चव्हाण यांनी या भागाची पाहणी करून दुकानदार व नागरिकांना भेट दिली. यानिर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चव्हाण यांनी स्थानिकांशी चर्चा केल्यावर लक्षात आले की, मागील अनेक वर्षापासून दर 2 ते 3 वर्षांनंतर मुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. एकदा तर जुन्या नगरपालिकापर्यंत पाणी पोहचले होते. हॉटेल दयानंद जवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे. त्यामुळे वरून येणारे पाणी आणि जास्त आणि पुलाखालून पास होणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाऊन त्याचा ओव्हर फ्लो आजूबाजूला होतो. दुकानात पाणी जाते असे सांगितले.
याबाबत कायमस्वरूपीची उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून दर 2-3 वर्षांनी येणारी नैसर्गिक आपत्ती बंद होईल. अशी भावना नागरिक व दुकानदार यांनी व्यक्त केली. यानंतर चव्हाण यांनी तहसील प्रशासनाशी फोनवर संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जास्तीत जास्त मदतीचा हात कसा देता येईल याबाबत चर्चा केली.