Home Cities चाळीसगाव रांगोळ्या काढून मंगेश चव्हाण यांचे स्वागत

रांगोळ्या काढून मंगेश चव्हाण यांचे स्वागत

0
30

WhatsApp Image 2019 10 16 at 8.32.49 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळत आहे. गावागावात त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. चव्हाण यांच्या प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे रांगोळी टाकून त्यांचे स्वागत करत आहेत.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन मंगेश चव्हाण नागरिकाशी संवाद साधत आहेत. त्यांची प्रचार रॅली शहर व गावांमध्ये आल्यानंतर चव्हाण यांचे विविध प्रकारे स्वागत करण्यात येत आहे. यात गावागावात घरासमोर माता – भगिनींनी रांगोळ्या काढून मंगेश चव्हाण यांचे अनोखे स्वागत करतांना दिसत आहेत. चव्हाण हे घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत आहेत.


Protected Content

Play sound