जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहरातील सिंधी कॉलनी, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर काँलनी, कासमवाडी, मासुम वाडी, सम्राट कॉलनी, रचना कॉलनी या ठिकाणी नागरीक आणि तरूणांशी भावना जाणून संवाद साधला. विविध नागरी प्रश्न आजही सामान्यांना भेडसावत असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीत भरभरून मते देऊनही भाजपचे नेते सामान्यांपासून खूप लांब आहेत.
रॅलीत यांनी घेतला सहभाग
यावेळी सोबत अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार भाई मलिक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, महानगराध्यक्ष मा.नामदेव चौधरी, लीलाधर तायडे, संदीप पाटील, राजेश पाटील, गणेश सोनवणे, राजू मोरे, लता मोरे, मीनल पाटील, मंगला पाटील, ममता सोनवणे, तुषार इंगळे, सोपान पाटील, कमलताई पाटील, रोहन सोनवणे, अमोल पाटील, मझर पठाण, रहीम तडवी, कौसर काकर तसेच अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.