चोपडा प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थितीत राहिल्यामुळे चोपड्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. थोडक्यात कैलासबापू आणि स्थानिक भाजपच्या भूमिकेमुळे प्रभाकरआप्पांचे राजकीय बळ अधिकचे वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील लासुर येथून नाटेश्वर महादेव मंदिरात नारळ वाढवून झंझावाती प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. कैलास पाटील यांनी या आधीच शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. अगदी त्यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून मातोश्रीवर लॉबिंग देखील केली. परंतू शिवसेनेने आमदार सोनवणे यांच्या सुविद्य पत्नींना उमेदवारी दिली. त्यामुळे कैलास पाटील हे विरोधात भूमिका घेणार, हे स्पष्ट होते. परंतू त्यांनी थेट अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना पाठींबा दिल्यामुळे चोपड्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे याचा फायदा प्रभाकर सोनवणे यांना होणार असल्याची जोरदार चर्चा आतापासून सुरु झाली आहे.
माजी आमदार कैलास पाटील यांची चोपडा विधानसभा मतदार संघात जबरदस्त पकड आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय पाठींबा किंबहुना प्रचारात थेट सहभाग घेणे म्हणजे प्रभाकरआप्पांचे राजकीय बळ वाढल्याचे मानले जात आहे. तर यानिमित्ताने चोपडा विधानसभा मतदार संघातील पुढील राजकीय समीकरण बदलले असून विद्यमान आमदार सोनवणे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे प्रभाकर सोनवणे यांचा विजयाचा मार्ग अधिकचा सुकर झालाय. त्याच पद्धतीने भाजपचे सर्व पदाधिकारी देखील एकजुटीने प्रभाकर सोनवणे यांच्या मागे उभे राहिले आहेत. यामुळे माजी आमदार कैलास पाटील यांचा शिवसेनेतील मोठा गट आणि संपूर्ण भाजप प्रभाकर सोनवणे यांच्या सोबत उभा राहिल्यामुळे चोपड्यातील राजकारण बदलले असून सर्व घडामोडी प्रभाकर सोनवणे यांच्या पथ्यावर पडणाऱ्या घडत आहेत. तर नगर पालिकेच्यावेळी माजी आमदार कैलास पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यातील मतभेदाची मोठी किनार सध्याच्या बदलेल्या राजकारणाला असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना-भाजपचे हे पदाधिकारी होते प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित
माजी आमदार कैलास पाटील, शांताराम आबा, पंचायत समितीचे सभापती संताराम माळके, जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे प्रदीप पाटील, ज्येष्ठ नेते जी.टी. पाटील, रावसाहेब प्रकाश रजाळे, गजेंद्र सोनवणे, राकेश पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत माळके, वना भिल, बापूराव पाटील, भूषण भिल, रामसिंग भील, रामचंद्र भादले, प्रल्हाद पाटील, सुभाष रायसिंग, गजेंद्र जयस्वाल, रवी मराठे, धनंजय पाटील, राजू ढाबे, हनुमंत महाजन, पंकज पाटील, रावसाहेब पाटील, देवा बापू , खटाबाई कोळी, भारती क्षीरसागर, पांंडुरंग सोनवणे, विनोद पवार, चंद्रकांत धनगर, मुरलीधर पाटील, रमेश वाघ, मगन महाजन, भिकन माळी, अमोल शिंपी, विठ्ठल वाघ, प्रताप बारेला, संदीप बारेला, प्रकाश बारेला, विठ्ठल वाघ, गुलाब पाटील, प्रकाश पाटील, नवल जोशी, ामकांत बोरसे, ईश्वर पाटील, सुनंदा पाटील, तुकाराम पाटील, सचिन धनगर, अवि पंजाबी, दीपक पाटील, जितू महाजन, अंजुम पिंजारी ,रोहिदास अहिरे, राधे श्याम गवळी, रामचंद्र पाटील, विष्णू चौधरी, किशोर पाटील, डॉ. सुधाकर पाटील, जिजाबराव पाटील, लक्ष्मण पाटील, फकीरा टेलर, रहिश शाह व अश्फाक शाह आदी उपस्थित होते.