Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे रोटरी क्लबतर्फे शालेय साहित्य वाटप

चाळीसगाव येथे रोटरी क्लबतर्फे शालेय साहित्य वाटप

0
115

knya school

 

चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब चाळीसगावतर्फे आज (दि.10) राष्ट्रीय कन्या हायस्कूल मधील गरजू विद्यार्थिंनीना शालेय साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.

रोटरी क्लब चाळीसगाव रोटे हरिश पल्लन, बाळासाहेब सोनवणे, विनोद बोरा, विवेक येवले आणि सनी वर्मा यांनी दातृत्व दाखवून गरजू विद्यार्थिनींसाठी निधी उपलब्ध करून शालेय साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जनसेवेची संधी दिल्याबद्दल राष्ट्रीय कन्या हायस्कूलचे रोटरी क्लब चाळीसगाव च्या वतीने आभार मानले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका कुमुदिनी पाटील, पर्यवेक्षक जाट सर व देशमुख मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य राजेंद्र कटारिया, मधुकर कासार, सुभाष जाधव, सचिव रोशन ताथेड हे देखील उपस्थित होते.


Protected Content

Play sound