Home क्राईम मनूर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या

मनूर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या


santosh

बोदवड प्रतिनिधी | तालुक्यातील मनूर येथे संतोष शामराव पाटील (वय-३४) ह्या तरुण शेतकऱ्याने आज (दि.८) सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास आत्महत्त्या केल्याची घटना घडली. आत्महत्त्येचे कारण मात्र कळू शकलेले नाही.

 

याबाबत भगवान शामराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून बोदवड पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. विषारी द्रव प्याल्याने अत्यवस्थ झालेल्या संतोष यास उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने कोणतातरी विषारी द्रव प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास बोदवड पोलीस स्टेशनचे पो.कॉ. भोसले करीत आहेत.


Protected Content

Play sound