जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर मतदार संघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज (दि.७) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्यापुढे अनेक समस्यांची गाऱ्हाणी मांडली. नागरिक म्हणाले की, गेल्या बऱ्याच वर्षांत विकासाच्या नावावर व भावनिक कारणांवर राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे विकास हरवल्याची स्थिती आज निर्माण झाली आहे. अनेक आश्वासने देण्यात आली पण आजपर्यंत त्यांची पुर्तता झालेली नाही.
यावेळी अभिषेक पाटील यांनी नागरिकांना सांगितले की, “भविष्यात आपण मला संधी मिळाल्यास मी निश्चीतपणे आपले प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलेन, त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. आपण माझ्यावर जबाबदारी टाकली तर ती पार पाडण्यासाठी मी सक्षम असल्याचे आज निश्चितपणे सांगू शकतो.”