Home Cities रावेर नवरात्रोत्सवानिमित्त रावेर येथे पोलिसांचे पथसंचलन

नवरात्रोत्सवानिमित्त रावेर येथे पोलिसांचे पथसंचलन


raver police

रावेर, प्रतिनिधी | शहरात नवरात्रोत्सवात देवी विसर्जनाच्या पूर्व संध्येला आज (दि.६) सायंकाळी ५.३० ते ६.४० दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांनी पथसंचलन केले.

 

यावेळी येथील पोलीस स्टेशनपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील चौक, नागझीरी चौक, स्वामी विवेकानंद चौक, राजे शिवाजी चौक, भोई वाडा व गांधी चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन अशा मार्गाने हे संचालन करण्यात आले. सदर पथसंचलनाला येथील पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आर.सी.पी.प्लाटून, एस.आर.पी.एफ.प्लाटून व होमगार्डस उपस्थित होते.


Protected Content

Play sound