भारत आणि बांगलादेश यांच्यात सात करार

modi ji

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण ७ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या गुरूवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. भारतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेख हसीना यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशहून एलपीजी आयात करण्यासह ३ प्रोजेक्टची लाँचिंग व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे केली. शेख हसीना यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराची माहिती दिली. गेल्या वर्षभरात भारत-बांगलादेशच्या १२ संयुक्त प्रोजेक्ट्सचे उद्धाटन करण्याची संधी मला मिळाली. आजच्या तिन्ही योजना वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. एलपीजी इंपोर्ट, व्होकेशनल ट्रेनिंग आणि सोशल फॅशिलिटी. तिन्ही योजनांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावणे. बांगलादेशहून एलपीजी आयात, बांगलादेश-इंडिया प्रफेशनल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि ढाकात रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवन हे होय. दोन्ही देशात एक एअर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान उड्डाण होणाऱ्या विमानांची संख्या वाढून ती आता आठवड्यात १२० केली जाणार आहे.

Protected Content