Home Cities यावल काँग्रेसतर्फे माजी आ.शिरीष चौधरी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेसतर्फे माजी आ.शिरीष चौधरी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार


shirish chaudhari

रावेर, प्रतिनिधी । माजी आमदार शिरीषदादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी (क), शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतर्फे दाखल करणार आहे.

रावेर शहरातील आठवडे बाजार, बहाणपूर रोड, रावेर येथून येत्या गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी माजी आमदार शिरीष चौधरी यांची उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी भव्य रॅली निघणार आहे. माजी आमदार चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी रावेर-यावल तालुक्यातील सर्व काँग्रेस व राष्ट्रवादी लोकप्रतिधिनी, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते यांनी माजी आमदार शिरीष चौधरींवर प्रेम करणारे सर्वांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound