Home क्राईम भुसावळात हद्दपार केलेल्या आरोपीस तलवारीसह अटक

भुसावळात हद्दपार केलेल्या आरोपीस तलवारीसह अटक

0
108

Bhusawal arm act

भुसावळ प्रतिनिधी । दोन वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपीला भुसावळ पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात हद्दपार आरोपी कलिम शेख सलिम शेख (वय-33) रा.दीनदयाल नगर, भुसावळ याला भुसावळ शहरातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे. हद्दपार असतांना आरोपी कलिम शेख हा भुसावळ शहरात येवून तलवार घेवून दहशत पसरवित असल्याची माहिती भुसावळ पोलीसांनी सायंकाळी 5.30 वाजता जामनेर रोडवरील हेवन हॉटेल समोर अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम-4/25, मुंबई पोलीस ॲक्ट कलम-142, कलम-37 (1) (3)चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, किशोर महाजन, अनिल पाटील, पो.का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे यांनी केली.


Protected Content

Play sound